गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, महाराष्ट्राला लाभलेल्या गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू जतन करून आपल्या संस्कृतीचं संवर्धन व्हावं, आणि याच वास्तूंच्या सहाय्यानं पर्यटनाला चालना मिळावी असं आम्हाला वाटतं. त्यासाठीचा हा प्रयत्न.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. परंतु अलीकडे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे, अशा परिस्थितीमध्ये वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या मदतीसाठी आमच्याक्डून एक छोटस योगदान.
रक्तदान शिबिराच्या कार्यातून समाजाची संकल्पना दृढ होत आहे. कार्यक्रमाला आलेले सर्व संयोजक त्यांच्या कार्याचा धडा संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा, असा आहे. आपले कार्य पाहून देवालाही आपला अभिमान असेल. त्यामुळे तुमची एक मदत आम्हाला लाखमोलाची आहे.
राजे सामाजिक प्रतिष्टान हि संस्था गड किल्ले संवर्धनामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे . सन २०१८ साली याच कार्याची दखल घेत पुण्यातील सह्याद्री संस्थेने प्रतिष्ठानला सह्याद्री सन्मान २०१८ या पुरस्काराने सन्मानित केले. हा कार्यक्रम विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे पार पडला .
राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोट व योगिता दंत महाविद्यालय व रुग्णालय खेद यांच्या सहकार्याने गोवळकोट येथे दंत चीकीत्सा शिबिर घेण्यात आले. दंत चिकित्सक डॉक्टर शोएब खतीब यांनी या शिबिराचे उद्घाटन केले . गोवळकोट वासियांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गोवळकोट गावाची सीमा (चर) म्हणजेच सध्याचा Crocodile Point येथे राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोटतर्फे गेल्या ४ वर्षापासून किल्ले गोविंदगडावर संवर्धनाचे कार्य सातत्याने सुरु आहे. रविवार दि १२ मे रोजी गडावर विशेष मोहीम घेण्यात आली ती म्हणजे गडावरील उत्तर दरवाजा. या मोहिमेस ट्रेक शिरीष, कालभैरव ढोल ताशा पथक या संस्थेचे सदस्य उपस्थित होते. तसेच पुणे येथील इतिहास अभ्यासक श्री संदीप (आबा) परांजपे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
राजे सामाजिक प्रतिष्टान हि संस्था गड किल्ले संवर्धन तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे . सन २०१९ साली याच कार्याची दखल घेत चिपळूण मधील लोकमान्य टिळक वाचनालय संस्थेच्यावतीने प्रतिष्ठानला गात जा अभंग २०१९ या पुरस्काराने सन्मानित केले. या कार्यक्रमास चिपळूणचे मा. आमदार सदानंद चव्हाण साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा पुरस्कार म्हणजे म्हणजे चिपळूणकरांनी संस्थ्येच्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आहे.
५ ऑक्टोबर १७३३ रोजी झालेल्या गोविंदगडावरील ऐतिहासिक लढाईमध्ये सरनौबत नरवीर पिलाजीराव गोळे यांचे वंशज महान सेनानी आनंदराव गोळे व इतर मातब्बर सरदारांच्या बलिदानाने पावन झालेला आजचा दिवस राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोट व सरनौबत पिलाजी गोळे प्रतिष्ठान यांच्या वतीने साजरा करण्यात येतो.
राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोट या संस्थेच्या वतीने बुधवार दि १५ ऑगस्ट २०१८ रोजी साजरा होणार्या ७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास डी. बी. जे. कॉलेज चे प्राध्यापक श्री श्याम जोशी सर अध्यक्ष म्हणून लाभले.
राजे सामाजिक प्रतिष्टान हि संस्था गड किल्ले संवर्धनामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे . सन २०१८ साली याच कार्याची दखल घेत चिपळूण मधील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रतिष्ठानला गणेश गौरव पुरस्कार २०१८ या पुरस्काराने सन्मानित केले. हा कार्यक्रममाधव सभागृह चिपळूण येथे पार पडला . हा पुरस्कार म्हणजे म्हणजे चिपळूणकरांनी संस्थ्येच्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आहे.
६ जुने शिवराज्याभिषेक सोहळा. यानिमित्त किल्ले गोविंदगडावर राजे प्रतिष्टान मार्फत स्वच्छता करण्यात आली. या मध्ये किल्ल्याच्या आतील तसेच तटबंदी बाहेरील सर्व प्लास्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. या महत्वपूर्ण दिवशी किल्ल्यावर काम करण्याचा आनंद वेगळाच होता. कामाच्या शेवटी शिवाजी शिवाजी महाराजांच्या जयघोषाने मोहिमेची सांगता झाली.
राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोटतर्फे गेल्या ४ वर्षापासून किल्ले गोविंदगडावर संवर्धनाचे कार्य सातत्याने सुरु आहे. रविवार दि १२ मे रोजी गडावर विशेष मोहीम घेण्यात आली ती म्हणजे गडावरील उत्तर दरवाजा. या मोहिमेस ट्रेक शिरीष, कालभैरव ढोल ताशा पथक या संस्थेचे सदस्य उपस्थित होते. तसेच पुणे येथील इतिहास अभ्यासक श्री संदीप (आबा) परांजपे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोट व वैभव लक्ष्मी ब्लड बँक याच्या सौजन्याने सालाबाद प्रमाणे माघी गणेश जयंती निमित्त मंगळवार दि २३ १ २०१८ रोजी महाराक्तदान शिबिराला उत्स्फूर्त नागरिकांचा प्रतिसाद लाभला. यावेळी मराठी शाळा पेढे या शाळेतील मुलांनी या शिबिरात सहभाग नोंदवला. यावेळी प्रतिष्ठान मार्फत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले .
राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोट आयोजित रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला श्री प्रसाद चिपळूणकर, श्री डॉ शोएब खतीब, नगरसेवक श्री भगवान बुरटे, नगरसेविका सौ सुषमा कासेकर, श्री जीवन बांद्रे उपस्थित होते. एकूण ५५ रक्तदात्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यामध्ये ४ महिलांनी रक्तदान केले .