चिपळूण तालुकयातील एक ऐतहासिक पार्श्वभूमी असलेला गोवळकोट या गावामध्ये सर्व सण-उत्सव एकोप्याने साजरे केले जातात. इथे साजरा होणारा शिस्तबद्ध शिमगा उत्सव हा हिंदू-मुस्लीम एकोप्याचे प्रतीक मानला जाते. 'सर्व धर्म समभाव' या वाक्याचा खरा अर्थ आपल्याला गोवळकोट मध्ये पाहायला मिळतो. गावामध्ये प्रमुख्याने वाळूचा व्यवसाय तसेच शेती केली जाते. शेतीमध्ये भात ,तुर ,पावटा तसेच इतर भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. गावाला खाडी लाभल्यामुळे इथे मासेमारी देखील केली जाते. गावाला ऐतिहासिक वारसा असल्यामुळे इथे अनेक पर्यटक भेट देत असतात. भविष्यामध्ये हे गाव पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचा केंद्रबिंदू ठरेल. असा सर्वगुणसंपन्न गोवळकोट गाव आहे.
करंजेश्वरी मंदिराजवळील पायऱ्या चढून गेल्यावर गडावर प्रवेश करण्यापूर्वी समोर दोन बुरूज व त्यामध्ये दरवाजाची जागा दिसते. परंतु आज तिथे किल्ल्याचा दरवाजा, त्याचे खांब व कमान यांच्या फक्त खुणाच शिल्लक आहेत.
गोवळकोट-गोविंदगडाच्या पायथ्याशी वाशिष्टी नदीच्या किनारी गोवळकोट धकका आहे. अतिशय सुंदर असे ठीकाण आहे.
गोवळकोट किल्याच्या दिशेन जाताना रस्त्याचा उजव्या हाताला एक सुंदर असे Crocodile Point आहे.