स्थापना - ९ जुलै २०१५, नोंदणी क्र. - ५५१६

              माणूस किती हि मोठा झाला तरी तो समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने आम्ही काही तरुण एकत्र येऊन मु. पो. गोवळकोट ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथे "राजे सामाजिक प्रतिष्ठान" या संस्थेची स्थापना केली आहे. गड संवर्धन या बरोबरच संस्था शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रांमध्ये गेले सात वर्ष सातत्यपूर्ण कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, करियर मार्गदर्शन शिबीर,गुणगौरव सोहळा विविध आरोग्य शिबीर गोविंद गडावर शिवजयंती इत्यादी अनेक उपक्रम राबविले जातात सदरच्या उपक्रमा अंतर्गत गोळकोट धक्का बंदर येथील सुमारे २००/३०० वर्षांपासून जमिनीत गाडलेल्या अवस्थेत असलेल्या तोफा सन 2017 साली ६ व सन 2021 साली ४ अशा एकूण १०तोफांचे संस्थेच्या माध्यमातून किल्ले गोविंद गडावर संवर्धित करण्यात आल्या आहेत या विविध उपक्रमांकरिता संस्थेला महाराष्ट्र शासनाने गड स्वच्छता सन्मानाने गौरविले आहे. महोदय सन २०२२ व भविष्या मध्ये राजे सामाजिक प्रतिष्ठान च्या माध्यमातून असे अनेक उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे.
             चिपळून नगरीत वसलेल्या ऐतिहासिक किल्ले गोविंद गडावर राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोट या संस्थेच्या माध्यमातून दुर्ग संवर्धना अंतर्गत गडावर नियमित साफसफाई गडावरील पुरातन वस्तूंचे जतन व संवर्धन असे उपक्रम चालू असतातच विशेषतः सदर चे सर्व उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या गड संवर्धन समितीचे सदस्य मा. डॉक्टर सचिन जोशी सर व इतिहास अभ्यासक मा.संदीप परांजपे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले जातात. महोदय गडाची सद्यस्थिती पाहता गडाची चारही बाजूंची तटबंदी व बुरुज ढासळलेले आहेत गडावरील असलेल्या अनेक पुरातन अवशेष नामशेष झालेले आहेत राजे सामाजिक प्रतिष्ठान ही संस्था गोविंद गडाचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे

कार्यकारी मंडळ

अ. क्र. नाव पद संपर्क क्र.
१. श्री. विशाल विलास राऊत अध्यक्ष ९५६१७८१४३७
२. श्री. अभय विठ्ठल जुवळे उपाध्यक्ष ९११२७६२४६१
३. प्रथमेश संतोष शिंदे सचिव ९१४५११९८१७
४. सौरभ जयवंत टाकळे खजिनदार ८६०५०८००६४
५. अनिकेत विक्रांत महाकाळ सहसचिव
६. प्रतिक गणपत रेमजे सहखजिनदार
७. श्री. प्रशांत काशिनाथ पोतदार सदस्य
८. शुभम अनिलकुमार टाकळे सदस्य
९. ओंकार विलास बुरटे सदस्य
१०. प्रतिक संतोष बुरटे सदस्य
११. अनिकेत अरविंद भैरवकर सदस्य

राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोट


श्वास समाजाच्या विकासाचा, ध्यास दुर्ग संवर्धनाचा...

क्र. महा./रत्ना./ रजि.नं.५५१६/ रत्नागिरी दि. ०९/०७/२०१५
मु.पो.गोवळकोट, ता.चिपळूण, जि.रत्नागिरी, महाराष्ट्र. पिन. नं. ४१५६०५

सामाजिक प्रतिष्ठान ही संस्था गोविंद गडाचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे.

आमच्या प्रतिष्ठान कडून सर्व शिवप्रेमींच सहर्ष स्वागत, आम्हाला असेच कायम सहकार्य करत रहा, धन्यवाद..!



+